१६ हजार मातांना जननी सुरक्षेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:13 AM2017-11-05T00:13:35+5:302017-11-05T00:13:48+5:30

जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७७ उपकेंद्र्राच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजनेतंर्गत यावर्षी १५ हजार ८१ हजार मातांना लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही़ व्ही़ मेकाने यांनी दिली़

16 thousand mothers have the benefits of mother protection | १६ हजार मातांना जननी सुरक्षेचा लाभ

१६ हजार मातांना जननी सुरक्षेचा लाभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७७ उपकेंद्र्राच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजनेतंर्गत यावर्षी १५ हजार ८१ हजार मातांना लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही़ व्ही़ मेकाने यांनी दिली़
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. त्यानुसार जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मातांना संस्थेत प्रसूतीसाठी आर्थिक लाभ देण्यात येतो़ २०१६-१७ मार्चअखेर १५ हजार ८१ (९१ टक्के) मातांना लाभ देण्यात आला़ जून २०१७ अखेर १ हजार ६८५ (१० टक्के) मातांना लाभ देण्यात आला़ कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ मार्चअखेर १७ हजार ९४३ (१०९ टक्के) स्त्री शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट साध्य झाले असून यावर्षी ८७२ स्त्री शस्त्रक्रिया (५ टक्के) जून २०१७ अखेर झाल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती व प्रोत्साहन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी मेकाने यांनी सांगितले़
संस्थेतील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत १०२ व १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा लाभ मिळत आहे. याअंतर्गत २४ तास विविध सेवा पुरविल्या जात आहेत. यामध्ये गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळांतपणे, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालयामध्ये सामान्य प्रसूती झालेल्या मातेस तीन दिवस तर सिझेरियन प्रसूती झालेल्या मातेस ७ दिवस मोफत आहार देण्यात येतो. नवजात अर्भकांना ० ते १ वर्षापर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी व औषधोपचार या सेवा मोफत पुरविल्या जातात.
गरोदर मातांना बाळंतपणाच्यावेळी व अर्भकांना घर ते रुग्णालय, रुग्णालय ते रुग्णालय (संदर्भसेवेसाठी) आणि रुग्णालय ते घर अशी वाहतूक सेवा मोफत पुरविण्यात येत आहे.

Web Title: 16 thousand mothers have the benefits of mother protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.