मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:30 PM2021-04-17T12:30:19+5:302021-04-17T12:30:37+5:30
आकाश शेलार हा मागील काही दिवसांपासून मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी जात असे.
चापानेर : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. आकाश अप्पासाहेब शेलार (१६) असे मृत मुलाचे नाव आहे.
आकाश शेलार हा मागील काही दिवसांपासून मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी जात असे. आज सकाळी सुद्धा तो मित्रांसोबत धरणाकडे पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. आकाश पाण्याबाहेर येत नसल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी मदतीसाठी नागरिकांकडे धाव घेतली. काही नागरिकांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन आकाशला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत आकाशचा मृत्यू झाला होता.