तुळजापूर यात्रेसाठी १६० बसेसची सोय
By Admin | Published: October 1, 2016 01:02 AM2016-10-01T01:02:41+5:302016-10-01T01:16:47+5:30
लातूर : लातूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणारा भाविकांचा वर्ग मोठा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सवासाठी १६० बसेसचे नियोजन करण्यात आले
लातूर : लातूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणारा भाविकांचा वर्ग मोठा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सवासाठी १६० बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याने लातूर जिल्ह्यातील भाविकांची सोय होणार आहे.
लातूर जिल्ह्यातून नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी व बसेसने जाणाऱ्या भाविकांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी लातूर विभागातून बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये लातूर ४०, निलंगा ४०, औसा ४०, अहमदपूर २०, उदगीर २० अशा एकूण ६० बसेसचे नियोजन करण्यात आले असून, या बसेसच्या माध्यमातून लातूर विभागाला ५० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी लातूर विभागातून या भाविकांच्या सोयीसाठी १५८ बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या बसेसच्या माध्यमातून ३९ लाखांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावर्षी मात्र गतवर्षीच्या प्रमाणात फक्त दोन गाड्या वाढवून तब्बल ११ लाखांचे वाढीव उत्पन्न देण्यात आले आहे. त्यामुळे लातूर विभागीय कार्यालयातील पाचही आगाराला उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)