१६४ कंपन्या, ६० हजार कोटींची उलाढाल; छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीची जगभर भरारी

By बापू सोळुंके | Published: December 5, 2023 02:33 PM2023-12-05T14:33:09+5:302023-12-05T14:35:01+5:30

औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ३० वर्षांपूर्वीची ओळख आजही कायम आहे.

164 companies, turnover of 60 thousand crores; Chhatrapati Sambhajinagar's pharma industry booms worldwide | १६४ कंपन्या, ६० हजार कोटींची उलाढाल; छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीची जगभर भरारी

१६४ कंपन्या, ६० हजार कोटींची उलाढाल; छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीची जगभर भरारी

छत्रपती संभाजीनगर : ५० ते ६० हजार कोटींची उलाढाल असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील फार्मा इंडस्ट्रीमध्ये १६४ लहान मोठ्या औषधी कंपन्या कार्यरत आहेत. यातील विविध नामांकित दहाहून अधिक कंपन्यांच्या औषधांना अमेरिकन एफडीएची मान्यता असल्याने येथे उत्पादित होणाऱ्या औषधींची जगभरात निर्यात होते.

निर्यात सुमारे १२ हजार कोटींपर्यंत आहे. औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ३० वर्षांपूर्वीची ओळख आजही कायम आहे. येथील चिकलठाणा, वाळूज, पैठण एमआयडीसीनंतर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि आता वेगाने विकसित होत असलेला ऑरिक सिटीचा दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उद्योग जगतासाठी आशेचा किरण आहे. मराठवाड्यातील १६४ फार्मास्युटिकल कंपन्यांची एकूण वार्षिक उलाढाल ५० ते ६० हजार कोटी रु. आहे. कोविड महामारीच्या काळात येथील सर्व उद्योग ठप्प असताना केवळ औषध निर्माण क्षेत्रात कार्यरत कंपन्या सुरू होत्या. याचा फायदा येथील इंडस्ट्रीजसोबतच कामगारांनाही झाला. येथील फार्मा इंडस्ट्रीमध्ये विविध उद्योजकांनी सुमारे ५० ते ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यातील अनेक कंपन्या येथे ४० वर्षाहून अधिक काळापासून व्यवसाय करीत आहेत. या कंपन्यांना कच्चा माल देशातील विविध कानाकोपऱ्यातून आणि शेजारील देशातून आयात करण्यात येतो.

सुमारे १२ हजार कोटींची निर्यात
सीएमआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज एमआयडीसीमधील दहाहून अधिक फार्मास्युटिकल कंपन्या अमेरिकन एफडीए मान्यताप्राप्त आहेत, तर काही कंपन्यांच्या औषधींना अमेरिकन एफडीएने मान्यता दिलेली आहे. यामुळे या कंपन्यांची औषधी अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांत निर्यात होते. दरवर्षी ही निर्यात सुमारे १० ते १२ हजार कोटी आहे.

फार्मा क्लस्टरचा प्रस्ताव डीएमआयसीकडे पडून
डीएमआयसीमध्ये स्वतंत्र फार्मा क्लस्टर असावे, अशी येथील फार्मास्युटिकल कंपन्यांची मागणी आहे. औषधी कंपन्या आणि त्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी एक स्वतंत्र क्लस्टर असावे, असे झाल्यास येथे आणखी नवीन फार्मास्युटिकल कंपन्या येतील. तसेच येथील कंपन्याही त्यांचा विस्तार करतील. याचा लाभ येथील उद्योगजगताला होईल, यासाठी सीएमआयएने ऑरिक प्रशासनाला फार्मा क्लस्टरसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र अद्याप हा प्रस्ताव मंजूर नाही.

 

Web Title: 164 companies, turnover of 60 thousand crores; Chhatrapati Sambhajinagar's pharma industry booms worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.