कोम्बिगमध्ये १७ आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:17 AM2017-09-28T00:17:32+5:302017-09-28T00:17:32+5:30
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री आयोजित कोम्बिग आॅपरेशनमध्ये पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री आयोजित कोम्बिग आॅपरेशनमध्ये पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
नांदेडच्या इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाणेहद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री कोम्बिग आॅपरेशन राबविण्यात आले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सपोनि. सुनील माने, पोउपनि. कल्याण नेहरकर, स्वाती कावळे, गजानन मोरे व पोउपनि. राजेश जाधव यांच्यासह ९० पोलीस कर्मचाºयांनी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील असर्जन नाका, बळीरामपूर चौक येथे नाकाबंदी केली.
त्याचवेळी कोम्बिग आॅपरेशन दरम्यान दोन ठिकाणी विशेष पथके स्थापन करुन व इंजेगाव, खुदबेनगर नांदेड, वसरणी, कौठा, बळीरामपूर व तुप्पा आदी भागांतील फरार तथा पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी कोम्बिग आॅपरेशनदरम्यान दारुबंदीचाही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात देशी-विदेशी दारुच्या एकूण २४० बाटल्या जप्त केल्या. ज्याची किंमत १२ हजार ४८० रुपये असल्याची माहिती गोपनीय शाखेतील नापोकॉ. विलास गरुडकर यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपअधीक्षक बनकर यांनी इतवारा हद्दीतही अशाप्रकारे कोम्बिग आॅपरेशन राबविले होते़