औरंगाबादेत अडीच महिन्यांत डेंग्यूचे १७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:02 AM2021-08-19T04:02:01+5:302021-08-19T04:02:01+5:30
दरवर्षी पावसाळा सुरु होताच डेंग्यू डोके वर काढतो. औरंगाबादेत २०१९ डेंग्यूचा अक्षरशः उद्रेक झाला होता. गेल्या १७ महिन्यांपासून कोरोनाच्या ...
दरवर्षी पावसाळा सुरु होताच डेंग्यू डोके वर काढतो. औरंगाबादेत २०१९ डेंग्यूचा अक्षरशः उद्रेक झाला होता. गेल्या १७ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी विळखा कायम आहे. जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात आला. यात जनजागृतीसह आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आले. कोरडा दिवस पाळणे, साठवलेले पाणी टाकून देणे, भंगार, कचऱ्याच्या ठिकाणी पाणी साचू न देणे, पिण्याचे आणि सांडपाणी साठवताना काळजी घेणे अशा उपाययोजनांबाबत दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्यानंतरही जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहे. जूनमध्ये सर्वाधिक १० रुग्ण सापडले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. डी. बी. घोलप म्हणाले, डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असून, यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १९ रुग्ण आढळले आहे. ज्या ठिकाणी रुग्ण सापडतो, तेथे आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत मनपा हद्दीत २ रुग्णांचे निदान झाले आहे.
------
औरंगाबादेतील डेंग्यूची परिस्थिती
महिना- रुग्णसंख्या
जानेवारी-१
मार्च-१
जून-१०
जुलै-५
ऑगस्ट-२