१७ लाखांचा अपहार : दोन जणांविरोधात गुन्हा
By Admin | Published: May 1, 2016 01:31 AM2016-05-01T01:31:47+5:302016-05-01T01:42:44+5:30
औरंगाबाद : एजंटाचे मिळणारे कमिशन स्वत: बँक खात्यात वळवून, १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : एजंटाचे मिळणारे कमिशन स्वत: बँक खात्यात वळवून, १७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण शर्मा (रा. नंदनवन कॉलनी), सतीश कोळी (रा. गजानन कॉलनी, गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीत हे दोघेही आरोपी काम करीत होते.
जालना रोडवर त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. १५ जानेवारी २०१५ पासून या आरोपींनी कंपनीने त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचा गैरवापर करून आपल्या कंपनीतील एजंटांचे मिळणारे कमिशन हे स्वत: बँक खात्यावर वळवून कंपनीची फसवणूक केली.
या प्रकरणावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धमकीही दिली. त्यामुळे कंपनीचे अधिकारी सुजित घळसासी यांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आहिरे हे पुढील तपास करीत आहेत.