१७ जि़प़ शिक्षकांना पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:27 AM2017-08-23T00:27:49+5:302017-08-23T00:27:49+5:30
इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्या जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शिक्षकांना मंगळवारी जि़प़मध्ये समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्या जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शिक्षकांना मंगळवारी जि़प़मध्ये समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली़
अंतर जिल्हा बदली अंतर्गत जिल्ह्यामध्ये ११४ शिक्षकांची बदली झाली होती़ त्यापैकी ८२ शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे रुजू होण्यासाठी अर्ज केले होते़ त्यापैकी ६१ शिक्षकांना यापूर्वी जि़प़च्या वतीने समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली होती़ उर्वरित २१ शिक्षकांना पदस्थापना देण्याच्या अनुषंगाने मंगळवारी जि़प़च्या सभागृहात समायोजन प्रक्रिया घेण्यात आली़ यावेळी २१ पैकी १७ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली़
उर्वरित ४ पैकी एक शिक्षक आजारी असल्याने उपस्थित राहू शकला नाही तर तीन शिक्षकांनी नियुक्त्या घेतल्या नाहीत़ त्यांना यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, हे शिक्षक जि़प़ने दिलेल्या जागेवर रुजू न झाल्यास त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यामध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ समायोजन प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची उपस्थिती होती़ या संदर्भात माहिती देताना शिक्षणाधिकारी गरुड म्हणाल्या की, जिल्ह्यातील जि़प़ शाळांमधील शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेवून समायोजित करण्यात आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत़
उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी सांगितले की, शिक्षकांची जास्तीत जास्त रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जि़पक़डून प्रयत्न केले जात असून, पारदर्शक पद्धतीने समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली़