मराठवाड्यात १७३१ कोरोना रुग्ण वाढले; ३२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:26 PM2020-09-15T12:26:37+5:302020-09-15T12:28:20+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २८, ८०२ झाली
औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी १७३१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद + ४२७
औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४२७ नव्या रुग्णांची भर पडली. तर पत्रकारासह जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २८, ८०२ झाली असून एकूण मृत्यूची संख्या ८१५ झाली आहे.
खाटासाठी बारा तास झिजविले रुग्णालयाचे उंबरठेhttps://t.co/sPf6BGSVea
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
नांदेड + ३५३
नांदेड : जिल्ह्यात ३५३ बाधित रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ जण कोरोनामुळे दगावले आहेत़ सोमवारी ३४१ कोरोनाबाधितांना सुटी देण्यात आली़ आतापर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ७९६ एवढी झाली आहे़ सोमवारी एकूण १ हजार ६२ अहवालापैकी ६६५ अहवाल निगेटिव्ह आले़ तर ३५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला़
बीड + २२८
बीड : जिल्ह्यात २२८ बाधितांची भर पडली असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७०१९ झाली असून एकूण मृत्यूची संख्या २०३ झाली आहे.
जालना + ९९
जालना : जिल्ह्यात ९९ रूग्ण आढळून आले असून तीन बाधितांचा सोमवारी मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६९ झाली आहे. जिल्ह्यात सहा हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्या पैकी कोरोनावर मात केलेल्या रूग्णांची संख्या ही पाच हजार १०६ एवढी आहे.
परभणी + १८६
परभणी : जिल्ह्यात १८६ रुग्ण आढळले असून, ५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता ४ हजार १०७ रुग्ण झाले असून, त्यापैकी १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार २०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लातूर + २५०
लातूर : जिल्ह्यात २५० बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आता बाधितांचा आलेख १२ हजार ५१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, यातील ९ हजार १४३ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ३६२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
एकूण मृत्यूची संख्या ८१५ झाली आहेhttps://t.co/qN70dGdhOC
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
उस्मानाबाद + १६३
उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी ६ मृत्यूची नोंद झाली आहे़ याशिवाय, आणखी १६३ बाधितांची भर पडली आहे़ यात सर्वाधिक ५४ रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात आढळले़ एकूण बाधितांची संख्या ८६९७ झाली असून २५२ जणांचा मृत्यू झाला आहे.
हिंगोली + २५
हिंगोली : जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून नवे २५ रुग्ण आढळले. आतापर्यंत २१४३ रुग्ण आढळले असून यापैकी १६४१ जण बरे झाले आहेत.