तीन तालुक्यांतील १७६ गावांचा पाणीप्रश्न सुटणार - लोणीकर
By Admin | Published: January 1, 2017 11:53 PM2017-01-01T23:53:03+5:302017-01-01T23:56:11+5:30
ज्ाालना : राज्यातील पहिलीच वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात मंजूर झालेली असून, या योजनेचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे.
ज्ाालना : राज्यातील पहिलीच वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात मंजूर झालेली असून, या योजनेचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे. यातून जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १७६ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री लोणकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत निम्नदुधना प्रकल्पाच्या उदभवातून ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. या योजनेसाठी २२३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ ३ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते होईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे राहणार आहेत. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, उर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
राज्यात प्रथमच वाटर ग्रीड योजना राबविण्यात येत असून, यातून मंठा तालुक्यातील ९५ गावे, परतूर तालुका ७२ गावे व जालना तालुक्यातील ८ गावांत पाणीपुरवठा योजना करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्रह लोणीकर यांनी दिली. पत्र परिषदेस माजी आ. अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, विरेंद्र धोका आदी उपस्थित होते.