१७६५ सभासदांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:32 PM2017-08-17T23:32:31+5:302017-08-17T23:32:31+5:30
येथील भारतीय स्टेट बँकेतील १ हजार ७६५ कर्जदार शेतकºयांचे बँकेने परस्पर कर्जाचे पूनर्गठन केले. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीत बसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा : येथील भारतीय स्टेट बँकेतील १ हजार ७६५ कर्जदार शेतकºयांचे बँकेने परस्पर कर्जाचे पूनर्गठन केले. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीत बसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील भारतीय स्टेट बँकेला परिसरातील देवगाव, नांदगाव, बोरकिनी, गिरगाव, कोठा, बेलुरा, वाघी यासह २३ गावे जोडली आहेत. या गावातील ४ हजार ५०० शेतकºयांना कर्जपुरवठा केला जातो. जून २०१६ मध्ये २५०० कर्जदार शेतकºयांनी कर्जाचे पूनर्गठन करून घेतले होते. तर १ हजार ७६५ शेतकरी थकबाकीत राहिले होते. यातील बुहतांश कर्जदार शेतकºयांची संमती न घेताच बँकेने या सर्वच कर्जदार शेतकºयांचे पूनर्गठन केले. त्यामुळे थकीत कर्जदार शासनाच्या कर्जमाफी योजनेत बसले नाहीत. याबाबत शेतकºयांनी बँकेकडे धाव घेऊन बँकेला विचारणा केली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, तहसीलदार स्वरुप कंकाळ, बँकेचे ग्रामीण मुख्य प्रबंधक कसबे यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावाही दिला. परंतु, अद्याप ठोस तोडगा निघाला नाही.
याबाबत बँकेच्या मुंबई येथील कृषी महाप्रबंधक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पूनर्गठीत कर्जदार थकबाकीत जाऊ नये, यासाठी चालू बाकीत आणण्यासाठी सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या.
त्यामुळे सर्व बँक प्रशासनाने कार्यवाही केली. परंतु, त्यानंतर शासनाने कर्जमाफी जाहीर केली. यामुळे असे प्रकार घडले आहेत. हा प्रकार शासनाला कळविला असून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.