१७९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:49 AM2017-07-26T00:49:17+5:302017-07-26T00:50:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता ३ आॅगस्ट रोजी दिली जाणार आहे.
सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर जिल्ह्यात होणाºया या पहिल्याच निवडणुका आहेत. सर्वाधिक ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किनवट तालुक्यात तर त्याखालोखाल २८ ग्रामपंचायती लोहा तालुक्यातील आहेत. माहूर तालुक्यात २६, हिमायतनगर २, हदगाव-६, अर्धापूर-२, नांदेड-८, मुदखेड-१, भोकर-३, उमरी-१, धर्माबाद-४, बिलोली-९, नायगाव- ७, कंधार-१५ आणि मुखेड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. १५ जुलैपर्यंत प्रभाग रचनेवरील आक्षेप स्वीकारण्यात आले होते. या आक्षेपाची सुनावणी २५ जुलै रोजी घेण्यात येत आहे. या सुनावणीनंतर ३ आॅगस्ट रोजी प्रभागरचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ८ आॅगस्ट रोजी या ग्रामपंचायतीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीवर ८ ते १४ आॅगस्टदरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. या हरकती व सूचनांच्या अंलबजावणीनंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम केल्या जाणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाईल व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही ग्रामपंचायतीने एखाद्या अथवा एकापेक्षा जास्त जागेसाठी पोटनिवडणूक घेऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम लावू नये, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.