औरंगाबादेत १८ शाळकरी मुलांना कुत्र्याचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:42 IST2018-01-06T00:42:19+5:302018-01-06T00:42:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मनपाच्या शाळेतून घरी येणाºया १८ मुलांना मोकाट कुत्र्याने रहेमानिया कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ चावा घेऊन ...

औरंगाबादेत १८ शाळकरी मुलांना कुत्र्याचा चावा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मनपाच्या शाळेतून घरी येणाºया १८ मुलांना मोकाट कुत्र्याने रहेमानिया कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ चावा घेऊन गंभीर जखमी केले, तर दुसरी घटना चिकलठाणा येथे वानराने चार दिवसांपासून धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडविली आहे. चिकलठाणा येथे वानराने अनेक जण जखमी केल्याची घटना घडली आहे. वन विभाग त्यास पकडण्याचे प्रयत्न करीत असून, ते वानर हुलकावणी देत असल्याने अखेर शार्प शुटरला वन विभागाने पाचारण केले आहे.
यशोधरा कॉलनी येथील मनपाची शाळा सुटल्यानंतर मुले सायंकाळी घरी जात असताना मोकाट कुत्र्याने शाळकरी मुलांवर हल्ला करून १८ मुलांना गंभीर जखमी केल्याचा थरार शुक्रवारी सायंकाळी घडला. सय्यद ऐहतीशाम सय्यद हाशम या मुलाच्या तोंडाला व गळ्याला या कुत्र्याने कडकडून चावा घेतला असून, त्याच्यासह अन्य मुलांनाही चावल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीला धावल्याने पुढील गंभीर अनर्थ टळला. महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्रे पकडण्याची गाडी शहरात फिरत असल्याचे अनेकांनी पाहिलेले नाही. मोकाट कुत्र्यांचा रात्रभर भुकण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक पहिलेच त्रस्त आहेत. त्यातही शाळेतून घरी येणाºया विद्यार्थ्यांवर पाण्याच्या टाकीजवळ कुत्र्याने हल्ला चढविल्याचा थरार सायंकाळी घडला.
घाटीत इंजेक्शन
उपलब्ध नाही...
४जखमी मुलांना पालक घेऊन घाटीत उपचारार्थ दाखल झाले; परंतु घाटीत कुत्रा चावल्यानंतर द्यावयाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितल्याने पालकाची मोठी धावपळ झाली. रात्री उशिरापर्यंत ७ जखमींना घेऊन पालक घाटीत उपचारासाठी दाखल झाले होते. काही रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन गेल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.