१८ दिवस एसटीची ‘हंगामी’ भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:47 PM2017-10-04T23:47:37+5:302017-10-04T23:47:37+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहनकडून दिवाळी सणानिमित्त हंगामी भाढेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दहा ते वीस टक्क्यांनी बसच्या तिकीटात दरवाढ करण्यात आल्याने ऐन सणासूदीत प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहनकडून दिवाळी सणानिमित्त हंगामी भाढेवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दहा ते वीस टक्क्यांनी बसच्या तिकीटात दरवाढ करण्यात आल्याने ऐन सणासूदीत प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. १४ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत ही भाढेवाढ राहणार असल्याचे हिंगोली आगाराकडून सांगण्यात आले.
ऐन दिवाळीच्या सणात भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. १८ दिवस ही भाडेवाढ सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा नेहमीच्या तिकीट दरापेक्षा जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीत सुट्यांच्या कालावधीत खाजगी बसकडून मोठी भाडेवाढ केली जाते. दिवाळी सण जवळ येताच मायदेशी परतण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असते. परंतु ऐन सणासुदीत तिकिटातील दरवाढीचा फटका सहन करावा लागतो. विशेष म्हणजे खाजगी बस कंपन्यांची भाढेवाढ तर गगनभरारीच घेते. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास ब्रिदवाक्य असलेल्या एस.टी. महामंडळानेही दिवाळीमध्ये तात्पुरती दरवाढ केल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली अगारातर्फे केले आहे.
दिवाळी हंगाम संपल्यानंतर १ नोव्हेंबरपासून पूर्वी लागू असलेल्या दराने प्रवासीभाडे आकारले जाणार आहे. महामंडळाने केलेली हंगामी भाढेवाढ कालावधीत विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक तसेच स्थानकप्रमुख यांना दरवाढ आकारणी काटकोरपणे करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत विभागीय कार्यालयाकडून दरपत्रक व कर्मचारी व अधिकाºयांनी हंगामातील नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. हंगाम संपताच प्रवाशांकडून मूळ प्रवासभाढे आकारले जाणार आहेत.
तुळजापूर यात्रेसाठी जादा बसेस
तुळजापूर यात्रेसाठी हिंगोली आगारातील १३ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ४ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत जादा बसेस धावणार असून कर्मचाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेकडे जाणाºया भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आगारातर्फे नियोजन करण्यात आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सोडली जाईल.