जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 04:40 PM2020-10-11T16:40:09+5:302020-10-11T16:40:35+5:30
दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे १८ दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.
औरंगाबाद : दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे १८ दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.
दि. ११ रोजी दु. २ ते २: ३० दरम्यान दरवाजा क्रं. १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२, २५, ११, २६, १३, २४, १५, २२, १७, २० असे दरवाजे ०. ५ फुट उंचीने उघडण्यात आले व ९४३२ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू करण्यात आला. पाऊस असाच कोसळत राहिला तर दरवाजे आणखी काही फुटाने उघडावे लागतील, असा संकेतही प्रशासनाने दिला आहे.