18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

By | Published: November 22, 2020 09:02 AM2020-11-22T09:02:09+5:302020-11-22T09:02:09+5:30

सर्वाधिक सहा साखर कारखाने येथे सुरू झाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई, जयभवानी, माजलगाव, छत्रपती, जय महेश एनएसएल आणि येडेश्वरी ...

18 sugar mills start crushing season | 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

googlenewsNext

सर्वाधिक सहा साखर कारखाने येथे सुरू झाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई, जयभवानी, माजलगाव, छत्रपती, जय महेश एनएसएल आणि येडेश्वरी शुगर या कारखान्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५ कारखाने सुरू झाले आहेत. संत एकनाथ, बारामती ॲग्रो, संभाजीराजे आणि घृष्णेश्वर या कारखान्यांचा यात समावेश आहे. १८ कारखान्यांनी आतापर्यंत दहा लाख टन उसाचे गाळप करून साडेसहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांना ६.६५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील ७ साखर कारखान्यांपैकी केवळ संत मुक्ताबाई शुगर अँड एनर्जी हा एकमेव साखर कारखाना यंदा सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा आणि आदिवासी साखर कारखान्यामध्ये उसाचे गाळप सुरू झाले आहे.

Web Title: 18 sugar mills start crushing season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.