छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार मतदार मृत; लाखभर मतदार दुबार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 07:48 PM2024-08-10T19:48:47+5:302024-08-10T19:49:00+5:30

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हा कार्यक्रम संपेल.

18 thousand voters dead in Chhatrapati Sambhajinagar district; Millions of voters twice | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार मतदार मृत; लाखभर मतदार दुबार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार मतदार मृत; लाखभर मतदार दुबार

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाच्या सूचनेने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. बीएलओच्या संपर्क अभियानात आतापर्यंत १८ हजार २२१ मतदार मृत आढळले आहेत, तर दुबार नावांची यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राजकीय पक्ष एक लाखाहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याच्या तक्रारी करत आहेत.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हा कार्यक्रम संपेल.

नऊ मतदारसंघातील २५ लाख मतदारांशी संपर्क
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात ३० लाख ८९ हजार ६८९ मतदार आहेत. बीएलओंनी २५ लाख मतदारांपर्यंत संपर्क केला आहे.

बीएलओंना काय आढळले?
एक हजार मतदार अनुपस्थित : ८०६९ मतदार अनुपस्थित आढळले.
एक हजार मतदार स्थलांतरित : ६१८८ मतदार स्थलांतरित झाले आहेत. \ १८ हजार २१ मतदार मृत : जिल्ह्यात १८ हजार २१ मतदार मृत झाले आहेत.
लाखभर मतदारांची नावे दुबार : जिल्ह्यात लाखभर मतदारांची नावे दुबार असल्याचे बोलले जात आहे. एक हजार जणांचे ब्लॅक-व्हाईट छायाचित्र : ७ हजार २८९ मतदारांचे कार्डवरील छायाचित्र खराब, ब्लॅक-व्हाईट आहे.

१३ ऑगस्ट रोजी बैठक
दुबार नावांबाबत १३ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. ९९ टक्के पुनरीक्षण झाले आहे. मृतांच्या नातेवाइकांनी फॉर्म नं. ७ भरून देणे गरजेचे आहे. त्यांनी अर्ज भरून दिला तर मृतांची नावे मतदार यादीतून वगळतील. प्रशासन स्वत:हून नावे वगळत नाही.
- देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

Web Title: 18 thousand voters dead in Chhatrapati Sambhajinagar district; Millions of voters twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.