१८०० कोटींचा अर्थसंकल्प; अनावश्यक कामे थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:23 AM2018-06-20T01:23:41+5:302018-06-20T01:24:08+5:30
शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले. यंदा मनपा प्रशासन १८०० कोटी रुपयांची अंमलबजावणी कशी करणार, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीत ६५० किंवा ७०० कोटी रुपये येतात. त्यापैकी तब्बल ५०० कोटी रुपये वेतन आणि अत्यावश्यक खर्चासाठी लागतात. विकासकामांसाठी प्रशासनाकडे केवळ २०० कोटी रुपयेच शिल्लक राहतात.
मनपाची प्रतिमा बदलावी लागेल
महापालिकेतील शेवटच्या लाईनवर काम करणारे कर्मचारी नागरिकांसोबत कसे वागतात, यावर पालिकेची प्रतिमा तयार होते. कर्मचा-यांनी नागरिकांसोबत सौैजन्यानेच वागले पाहिजे. मनपा कर्मचाºयांचे सौैजन्याशी काहीच देणे-घेणे नाही, या थेट प्रश्नावरही आयुक्तांनी नमूद केले की, हे चित्र बदलावे लागेल. जोपर्यंत तुम्ही नागरिकांसोबत चांगले वागणार नाहीत, तोपर्यंत नागरिकही तुम्हाला सहकार्य करणार नाहीत.