१९ हल्लेखोरांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:18 AM2018-08-12T00:18:47+5:302018-08-12T00:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तोडफोडीत जवळपास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तोडफोडीत जवळपास ६० कोटींचे नुकसान झाले. याप्रकरणी आतापर्यंत ४९ कारखान्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या
आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात ९ आॅगस्टला पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. औद्योगिकनगरीतील अनेक कंपन्यांत यंत्रसामुग्री व साहित्याची तोडफोड करण्यात आली. उद्योजकांनी शुक्रवारपासून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली होती. तोडफोड करणाऱ्या १७ हल्लेखोरांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी अटक केली
होती.
आतापर्यंत इंडुरन्स, स्टरलाईट, सिमेन्स, व्हेरॉक, कॅनपॅक, वोक्हार्ट, तुळजा, गुडईअर, तुषार इंडस्ट्रीज, एफडीसी, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, मार्गनाईट, युरोलाईफ, कोलगेट, जे. के. केमिकल्स, मायलॉन, नहार इंजिनिअरिंग, कॉम्प्टन अॅण्ड ग्रिव्हज, एनआरबी बेअरिंग आदी कंपन्यांत ५९ कोटी ९० लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
आतापर्यंत ४९ कंपन्यांनी दिली तक्रार
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात शनिवारी स्पेशालिटी पॉलिफिल्मस्, काल्सबर्ग, मेकॅनिक्स, आकांक्षा पॅक्स, मेटलमॅन आॅटपो, बेसेल पॉलिफिल्मस्, अत्रा फार्मास्युटिकल, नरेश इंजिनिअरिंग, भारत इन्शुलेशन, श्री गणेश प्रेस अॅण्ड कोट, कमलेश ट्रान्सपोर्ट, विनोद इंटरप्रायजेस, श्रेया लाईफ, टायोलुसीड, मान डिझेल अँड टर्बो इंडिया, व्हॅक्युल कंपोनंटस् अॅण्ड प्रोजेक्ट, न्यू बॉम्बे इंजिनिअरिंग, शिवम रबर इंडस्ट्रीज, कॉस्मो फिल्मस्, यशश्री प्रेस कॉम्पस प्रा. लि., युनायटेड जनसेट ट्रॉली, ट्रम्फ प्रा.लि., शुभनिल इंडस्ट्रीज, जे. एल. मॉरिसन इंडिया, मराठवाडा आॅटो कॉम्पो प्रा. लि. व अमरी इंडिया आदी ४९ कंपन्यांनी तक्रार दिली आहे.
दुसºया दिवशीही धरपकड सुरूच
वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोडप्रकरणी पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी १७ व शनिवारी १९ हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीत नावे दाखल असलेल्या हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. रस्त्यावर गुंडगिरी करणाºया हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त नीलेश खाटमोडे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
हल्लेखोरांची माहिती देण्याचे आवाहन
या तोडफोड प्रकरणात सहभागी असलेल्या हल्लेखोरांची नावे पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे. या हल्लेखोरांची माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
अटकेतील आरोपींची नावे
तोडफोड करणाºया १७ हल्लेखोरांना शुक्रवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून आदेश धोंगडे, रणजित चव्हाण, गजानन पाटील, दत्तात्रय घावट, योगेश झोरे, गोविंद जाधव, विठ्ठल मुळे, गणेश गायकवाड, राहुल पवार, कल्याण आग्रे, सूरज साळुंके, गोविंद देशमुख, ओम जाधव, रवी पठारे, रवी कानडे, सतीश शिंदे, सचिन सुकणे, शंकर चरखा, आदित्य लेंगरे या १९ हल्लेखोरांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीत नावे दाखल असलेल्या हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. गुंडगिरी करणाºया हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त नीलेश खाटमोडे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.