अनधिकृत भूखंड विकणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:43 PM2019-06-12T22:43:28+5:302019-06-12T22:43:40+5:30

वडगाव कोल्हाटी शिवारात अनधिकृत प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री करणाºया १९ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 cases filed against unauthorized plots were sell out | अनधिकृत भूखंड विकणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनधिकृत भूखंड विकणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

वडगाव कोल्हाटी : सिडकोच्या पथकाने एप्रिल महिन्यात केली होती पाहणी
वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणा-या वडगाव कोल्हाटी शिवारात अनधिकृत प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री करणाºया १९ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात असलेल्या वडगाव कोल्हाटी शिवारातील गट क्रमांक ५ व ६ मध्ये अनेक ठिकाणी अवैधपणे प्लॉटिंग पाडली आहे. विशेष म्हणजे या लोकांंनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन या भुखंडांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी घेतल्या आहेत. दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसीलदार आदींकडे तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, सिडकोच्या पथकाने १५ एप्रिलला पाहणी केली होती. यात अनेकांनी अवैधपणे प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री सुरु केल्याचे निदर्शनास आले.


यासंदर्भात सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांनी बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन अब्दुल रहेमान, शेख सुलेमान, प्रकाश काची, राजेंद्र सलामपुरे, पुरुषोत्त अंभुरे, हनुमान जरांगे, श्री.गणे, गृह सं.मर्या.तर्फे अध्यक्ष व सचिव, रविंद्र पाटील, चंद्रशेखर थोरात, किशोर म्हस्के व इतर, काकासाहेब कान्हेरे,गंगाधर जाधव, विजय साळे, गट क्रमांक ९ मधील कृष्णा साळुंके, भाऊसाहेब अंभोर, सांडुराव साळवे, मिलिंद बकले तर गट क्रमांक १३ मधील संतोष चंदन, निलेश साळवे अशा १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: 19 cases filed against unauthorized plots were sell out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.