कीटकनाशके पळविणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:28 AM2018-09-03T01:28:15+5:302018-09-03T01:28:29+5:30

विविध ठिकाणच्या एजन्सींना पुरवठा करण्यासाठी वाहनातून पाठविलेली सुमारे साडेआठ लाखांची कीटकनाशके विश्वासघाताने पळविणाऱ्या दोन जणांना जिन्सी पोलिसांनी अटक केली.

2 arrested for thieft of pesticides | कीटकनाशके पळविणारे दोघे अटकेत

कीटकनाशके पळविणारे दोघे अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विविध ठिकाणच्या एजन्सींना पुरवठा करण्यासाठी वाहनातून पाठविलेली सुमारे साडेआठ लाखांची कीटकनाशके विश्वासघाताने पळविणाऱ्या दोन जणांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सुमारे ८ लाख २८ हजार ९६० रुपयांचा औषधीसाठा पोलिसांनी शनिवारी रात्री नारेगाव परिसरातून हस्तगत केला.
शेख सालेह चाऊस (३५, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) आणि अब्दल्ला अमोदी सईद अमोदी (५३, रा. इंदिरानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी वाहनचालक आहेत. तक्रारदार सय्यद शकील सय्यद बिस्मिल्ला (रा. शिवनी, ता. जि. अकोला) यांची अकोला येथे ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्टमधून आरोपींना १८ आॅगस्ट रोजी ट्रकमधून औषधीसाठा विविध ठिकाणच्या एजन्सींना पुरवठा करण्यासाठी दिला. हा औषधीसाठा नियोजित ठिकाणी न पोहोचविता आरोपींनी परस्पर औरंगाबादेतील कटकटगेट भागात आणला. तेथे एका वॉश्ािंग सेंटरसमोरून दुस-या वाहनांत हा माल भरला आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावली.
माल वेळेत न पोहोचल्याने ट्रान्सपोर्ट चालक सय्यद शकील यांना आरोपींवर संशय आल्याने त्यांनी काल औरंगाबाद गाठले आणि आरोपी वाहनचालकांना भेटून मालाविषयी विचारणा केली. तेव्हा त्यांनी औषधीसाठा संबंधितांना पोहोचता केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्याने रिकामी गाडी दाखविली. मात्र आरोपी खोटे बोलत असल्याचे तक्रारदारांना माहीत असल्याने त्यांनी लगेच जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: 2 arrested for thieft of pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.