जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाखांचा आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:31 AM2017-07-21T00:31:26+5:302017-07-21T00:33:35+5:30
नांदेड : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७- १८ या वर्षासाठी जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाख १२ हजारांचा आरखडा मंजूर करण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०१७- १८ या वर्षासाठी जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाख १२ हजारांचा आरखडा मंजूर करण्यात आला आहे़ या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे़
या योजनेतंर्गत अनुसूचित जातीसाठी ५८ लाख ७० हजार तर अनुसूचित जमातीसाठी ३३ लाख ३७ हजार रूपये तसेच सर्वसाधारण १ कोटी ३० लाख ८६ हजार रूपये अनुदान या प्रमाणे आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे़ योजनेत क्षेत्रविस्तार(आंबा घनलागवड, पेरू घनलागवड), पुष्पोत्पादन(सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहिक शेततळे, यांत्रिकीकरण(ट्रॅक्टर २० एच़पी़ पर्यंत ), हरितगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेट मधील फुले लागवड, शेडनेट मधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे़ तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यासाठी जिल्ह्याला २७ लाख ९१ हजार रूपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़
या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (२० अश्वशक्ती पर्यंत ), पॉवर टिलर (८ अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (८ अश्वशक्ती पेक्षा जास्त), २० एच़ पी़ पर्यंत ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलीत अवजारे(नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर पेरणी यंत्र)आदी बाबींचा समावेश आहे़