२ कोटी ५९ लाख दरमहा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:04 AM2021-07-12T04:04:02+5:302021-07-12T04:04:02+5:30

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने युद्धपातळीवर कंत्राटी ...

2 crore 59 lakhs per month | २ कोटी ५९ लाख दरमहा खर्च

२ कोटी ५९ लाख दरमहा खर्च

googlenewsNext

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने युद्धपातळीवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७८३पर्यंत पोहोचली. दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल २ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने चार महिन्यांचा पगार थांबला आहे. पगारावर खर्च करण्यासाठी मनपाला १० कोटींहून अधिक रक्कम हवी आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण खर्च शासनाकडूनच करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी मनपाला निधी उपलब्ध करून देण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जवळपास ६८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी या निधीची मागणी केली. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वाधिक खर्च करावा लागतोय. ७८३ कर्मचाऱ्यांच्या पगाराला दरमहिन्याला २ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपये लागतात. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही रक्कम १० कोटी ३७ लाख ३२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत कंत्राटी कर्मचारी मनपा सेवेत ठेवण्यात येणार आहेत. तिसरी लाट कधी येईल, हे निश्चित नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून पगार देण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर सेवा बळकट करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर होऊ शकतो. मात्र, असे होताना दिसून येत नाही. लसीकरणासाठी काही कर्मचाऱ्यांचा वापर सुरू आहे. बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी, मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे काही कर्मचारी कार्यरत आहेत. मेल्ट्रॉनमध्ये तर २५ रुग्णांचा सांभाळ करण्यासाठी २५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च

कर्मचारी संख्या- दरमहा खर्च

२९४ आयुष डॉक्टर- १,४७,००,०००

१८४ पॅरामेडिकल स्टाफ- ३१,२८,०००

१३९ अधिपरिचारिका- २७,८०,०००

१२१ वॉर्डबॉय- १४,५२,०००

३३ वैद्यकीय अधिकारी- ३३,००,०००

०३- सुपरस्पेशलिस्ट- ३,७५,०००

०२- हॉस्पिटल मॅनेजर- ७०,०००

०२- स्टोअर किपर-४०,०००

०१- कौन्सिलर- २०,०००

०४- डिईओ- ६८,०००

एकूण- ७८३- २,५९,३३,०००

Web Title: 2 crore 59 lakhs per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.