मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 15:30 IST2024-10-05T15:29:45+5:302024-10-05T15:30:38+5:30
लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे

मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. विभागात आजवर मतदारांचा आकडा १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ वर गेला आहे. लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत २ लाख ४२ हजार ३५२ मतदार वाढले आहेत. मतदार केंद्रांची संख्या आता १६ हजार ८२६ एवढी झाली आहे. पुरुष मतदार ८१ लाख ४८ हजार ७६३ आणि महिला मतदार ७४ लाख ८७ हजार १८९, तर इतर मतदार ५१२ असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
६४३ केंद्र वाढली
लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत १६ हजार १८३ केंद्र होती. आता १६ हजार ८२६ केंद्र झाली आहेत. ६४३ केंद्र वाढली आहेत.
मतदान केंद्रांची संख्या :
जिल्हा - मतदानकेंद्र संख्या
छत्रपती संभाजीनगर : ३,२६४
जालना : १,७५५
परभणी : १,६२३
हिंगोली : १,०१५
नांदेड : ३,०८८
लातूर : २,१४२
धाराशिव : १,५२३
बीड : २,४१६
एकूण : १६,८२६
मतदारांच्या संख्येत राजधानी आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर : ३१ लाख ४५ हजार २०३
जालना : १६ लाख २३ हजार ९४३
परभणी : १५ लाख ३२ हजार ३०७
हिंगोली : ९ लाख ७४ हजार ५४१
नांदेड : २७ लाख ५१ हजार ६३८
लातूर : २० लाख १६ हजार ९९०
धाराशिव : १३ लाख ९४ हजार १२
बीड : २१ लाख ९७ हजार ८३०