२ लाख ८५ हजार मालमत्ता कर थकीत, नळ कनेक्शन खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:06+5:302021-02-14T04:05:06+5:30
सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडला, ५ हजार दंड औरंगाबाद : महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील रस्ते सिमेंटने गुळगुळीत केले ...
सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडला, ५ हजार दंड
औरंगाबाद : महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील रस्ते सिमेंटने गुळगुळीत केले आहेत. नागरिक किरकोळ कामांसाठी परवानगी न घेता सिमेंट रस्ते फोडत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. विठ्ठलनगर येथे आर.के. गोखले, जितेंद्र पाटील यांनी सिमेंट रस्ता फोडल्याबद्दल महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने त्यांना पाच हजार रुपये दंड आकारला.
कॅरिबॅगचा वापर, ४ व्यापाऱ्यांना दंड
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या कॅरिबॅगचा वापर करू नये, असे वारंवार सांगितल्यानंतर व्यापारी कॅरिबॅगचा वापर करीत आहेत. मनपाच्या नागरिक मित्र पथकाने ४ व्यापाऱ्यांकडून १८ हजार रुपये दंड वसूल केला.
रस्त्यावर थुंकणारे ७० बहाद्दर सापडले
औरंगाबाद : पान, गुटखा खाऊन रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्या ७० जणांना मनपाच्या नागरी मित्र पथकाने रंगेहाथ पकडले. प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे त्यांच्याकडून ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
दिवसभरात ८४३ नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : शहरात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ८४३ नागरिकांची कोरोना टेस्ट केली. अँटिजन पद्धतीने १३४ नागरिकांची टेस्ट केली असता त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ७०९ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले.
रेल्वेस्टेशन, विमानतळावर २९९ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर २९९ प्रवाशांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली. जाधववाडी भाजी मंडईत २७, छावणी आठवडी बाजारात चार जणांची तपासणी केली.