औरंगाबाद परिमंडळात २ लाख वीज ग्राहक झाले डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:02 AM2021-04-01T04:02:16+5:302021-04-01T04:02:16+5:30
‘एसटी’ची डिझेल कोंडी औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला विशेषत: मध्यवर्ती बसस्थानकाची गेल्या काही दिवसांपासून डिझेल कोंडी सुरू आहे. ...
‘एसटी’ची डिझेल कोंडी
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला विशेषत: मध्यवर्ती बसस्थानकाची गेल्या काही दिवसांपासून डिझेल कोंडी सुरू आहे. डिझेलचा टँकर वेळेवर येत नसल्याने एसटीच्या वाहतुकीवर वारंवार परिणाम होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी रात्रीपासून डिझेलच्या टँकरची प्रतीक्षा केली जात होती. हा टँकर बुधवारी दुपारी दाखल झाला. दरम्यान, बसगाड्यांना अन्य ठिकाणाहून डिझेल घेण्याची, काही बस आगारातच उभ्या करण्याची वेळ ओढावली.
मोतिबिंदू शस्त्रक्रियेच्या चौकशीचा
अहवाल मिळणार १५ दिवसांत
औरंगाबाद : मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना जंतू संसर्ग झाला होता. याप्रकरणी समितीमार्फत चौकशी केली जात आहे. या समितीचा आगामी १५ दिवसांत अहवाल मिळणार आहे, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
मुंबईतील कर्तव्यापासून दूर
राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवा
औरंगाबाद : मुंबईला बेस्ट वाहतुकीसाठी एकदाही न गेलेल्या चालक-वाहकांना कर्तव्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे केली आहे. विशेषत: वैजापूर आगारातून कमीत कमी दिवस आणि एकदाही न गेलेल्यांना मुंबईत कर्तव्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
घाटीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच
औरंगाबाद : घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दिवाळीपासून साखळी उपोषण सुरूच आहे. रोज दोन ते पाच कर्मचारी उपोषणस्थळी बसत आहे. थकीत वेतन देणे, कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे आदी मागण्यांसाठी हे उपोषण केले जात आहे. घाटी प्रशासन आणि शासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांतून होत आहे.