असंघटित कामगारांना विम्याचे कवच; एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा
By साहेबराव हिवराळे | Published: December 8, 2023 06:51 PM2023-12-08T18:51:34+5:302023-12-08T18:53:04+5:30
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यावर नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता दोन लाखांचे विमा कवच दिले जाते. त्यांना अपघात प्रसंगी आणि दवाखान्यात उपचारासाठीचा उपक्रम त्यात जोडलेला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मोफत देण्यात आलेला आहे. नोंदणी दरम्यान पूर्ण डाटा सरकारकडे लिंक असून, त्याचा तुम्हाला फायदा होतो.
काय आहे ई-श्रम पोर्टल?
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर सर्वप्रथम ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यावर संगणकावर ई-श्रम ॲप्लिकेशनवर नोंदणी होते किंवा एखाद्या सेंटरवरही नोंदणी करू शकता. आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईलवर ही नोंदणी होते. त्याचे संदेश येतात.
ई-श्रम पोर्टलवर दीड लाख कामगारांची नोंदणी
आधारकार्ड व मोबाईल नंबर त्यासोबत लिंक करणे जरुरी आहे. शहरात दीड लाखापेक्षाही अधिक कामगारांनी ई-श्रम नोंदणी केलेली आहे. एक पैसाही न भरता हा अपघात विमा यात जोडलेला आहे. अतिगंभीर प्रसंगी हा मदतीला येतो.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी कशी कराल?
स्वत:च्या मोबाईलवर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून किंवा सेतू सेंटरवरही आधारकार्डचा नंबर जोडून नोंदणी करता येते. असंघटित कामगारांसाठी ही आरोग्य संजीवनीच असल्याचे मानले जाते.
नोंदणीसाठी निकष काय?
ई-श्रम पोर्टलवर कुणीही असंघटित क्षेत्रातील १८ वर्षांवरील कुणीही मजूर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर आरोग्यविषयक योजनेचे लाभ मिळतात.
हंगामी मजुरांनी फायदा घ्यावा...
सरकारने हंगामी मजुरांसाठी ई-श्रम नोंदणी सुरू केलेली आहे. त्यांना त्या बदल्यात बांधकाम साहित्य व इतर योजना देखील दिल्या जातात. आरोग्य विमा देखील २ लाखांपर्यंत मोफत असून, काम करताना अपघात झाल्यास त्याचे प्राण वाचण्यासही हातभार लागतो.
- कामगार कल्याण अधिकारी