कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथे २०० कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:31 PM2021-01-30T12:31:11+5:302021-01-30T12:32:13+5:30

Bird Flu बेलखेडा येथील कुंजीलाल ईश्वर राठोड यांनी धनगरवाडीजवळ कोंबडयांसाठी शेड बनवले आहे.

200 chickens die at Belkheda in Kannada taluka | कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथे २०० कोंबड्यांचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथे २०० कोंबड्यांचा मृत्यू

googlenewsNext

कन्नड - तालुक्यातील बेलखेडा येथे २०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुधन अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. 

बेलखेडा येथील कुंजीलाल ईश्वर राठोड यांनी धनगरवाडीजवळ कोंबडयांसाठी शेड बनवले आहे. शनिवारी सकाळी ते शेडकडे जात असतांना काही जणांनी त्यांना शेड मधील कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यांनी लागलीच शेड कडे धाव घेतली. यावेळी शेड मधील जवळपास २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याची माहिती मिळताच पशुधन पर्यवेक्षक डॉ. एम. एस. सुसुंद्रे घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पशुधन विभागाने पुढील कारवाई सुरु आहे. 

Web Title: 200 chickens die at Belkheda in Kannada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.