मनपाकडून घाटीला २ हजार पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:14 AM2018-09-12T01:14:19+5:302018-09-12T01:14:49+5:30

आरोग्य विभागाने महापालिकेला सोमवारी २० हजार पोलिओ डोस दिले होते. त्यातून घाटी रुग्णालयास महापालिके ने तब्बल १५ दिवसांनंतर मंगळवारी केवळ २ हजार पोलिओ डोसचा पुरवठा केला.

2,000 polio doses to Ghati hospital by AMC | मनपाकडून घाटीला २ हजार पोलिओ डोस

मनपाकडून घाटीला २ हजार पोलिओ डोस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरोग्य विभागाने महापालिकेला सोमवारी २० हजार पोलिओ डोस दिले होते. त्यातून घाटी रुग्णालयास महापालिके ने तब्बल १५ दिवसांनंतर मंगळवारी केवळ २ हजार पोलिओ डोसचा पुरवठा केला. जवळपास महिनाभर पुरेल इतक्या लसीतून २ हजार नवजात शिशूंना डोस देता येणार आहेत. शिवाय या लसी मिळण्यास उशीर झाल्याने मंगळवारीदेखील अनेक शिशूंना डोस देता आला नाही.
गोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटी रुग्णालयात पोलिओची लसच (ओरल व्हॅक्सिन) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवजात शिशूंना पोलिओ लस देणे महत्त्वपूर्ण असून, गेल्या काही दिवसांत घाटीत जन्मलेल्या ९०० पेक्षा अधिक शिशूंनाही लस मिळाली नाही. त्यामुळे या नवजातांना पोलिओ होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला. याविषयी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने घाटी रुग्णालयास २ हजार पोलिओ डोसचा पुरवठा केला.

Web Title: 2,000 polio doses to Ghati hospital by AMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.