२००० गणेश मंडळांकडून उत्सवाची तयारी
By Admin | Published: August 26, 2016 12:33 AM2016-08-26T00:33:40+5:302016-08-26T00:43:26+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती मूर्तिकारांकडे बुकिंग केली आहे.
राजकुमार जोंधळे , लातूर
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती मूर्तिकारांकडे बुकिंग केली आहे. जिल्हाभरात केवळ गणेशमूर्ती विक्रीतून दोन कोटींची तर त्यानुषंगाने लागणाऱ्या साहित्यांच्या विक्रीतून तब्बल १० कोटींची उलाढाल होते.
यातून अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो. मुंबई, पुणे, पेण, सोलापूर आणि हैदराबाद येथून गणेशमूर्तींची आयात व्यापारी करतात. या काळात गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकानेही आता सजू लागली आहेत. यानिमित्ताने गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या सजावटींच्या साहित्यांचीही स्टॉल्स लागली आहेत. जिल्हाभरात गणेशोत्सव काळात तब्बल १० कोटींच्या घरात आर्थिक उलाढाल होत आहे.