२०० कि.मी. अंतर १३ तासांत केले पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 08:25 PM2018-11-04T20:25:56+5:302018-11-04T20:27:05+5:30
ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.
जयंत कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.
सात वर्षांपासून सायकल चालवण्याची आवड असलेल्या अभिजित बंगाळे यांनी लहान मुले चालवतात त्या २0 इंची उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचा निर्धार केला. तसे पाहता नॉर्मल सायकलची उंची ही साधारणत: २८ इंच असते. २0 इंच सायकल तयार करणाऱ्यांनी ही सायकल जास्तीतजास्त १0 कि.मी. अंतरच चालवू शकता, असे सांगितले;
परंतु अभिजित बंगाळे यांनी
आॅडेक्स इंडियातर्फे आयोजित
२00 कि.मी. अंतर या छोट्या
उंचीच्या सायकलवर पूर्ण करण्यास गुरुवारी सकाळी ६ वाजता क्रांती चौक येथून प्रारंभ केला. जाताना थंड हवा आणि पोषक वातावरणामुळे त्यांनी नगर जिल्ह्यातील टोलनाका सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी गाठला. परतीचा मार्ग मात्र क्षमतेचा कस घेणाराच होता.
सायकल २0 इंच उंचीची असल्यामुळे सीट खाली करून चालवली, तर गुडघ्यावर प्रचंड ताण यायला लागला, तर सीट वर करून चालवली, तर पाठीवर ताण पडू लागला. त्यातच येताना वाहनांची प्रचंड वर्दळ. त्यासोबतच प्रचंड ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे वारे यांची तमा न बाळगता अभिजित बंगाळे यांनी जिद्दीच्या जोरावर छोट्या सायकलवरही २00 कि.मी. अंतर १३ तासांत पूर्ण करण्याची किमया साधली.
सायंकाळी ७ वाजता ते क्रांती चौक येथे पोहोचले. विशेष म्हणजे आॅडेक्स इंडियातर्फे २00 कि.मी. अंतर हे साडेतेरा तासांत पूर्ण करायचे होते. मात्र, त्यांनी हे अंतर केवळ तेरा तासांतच पूर्ण केले. विशेष म्हणजे एनर्जिल व इलेक्ट्रॉल या ऊर्जा वाढवणाºया द्रव्यांचाही त्यांनी उपयोग केला नाही.
भारतात २0 इंच उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करणारे जवळपास कोणीही नाही. आपण आता लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहोत. याआधीही आपण २00, ४00 व ६00 कि.मी. अंतर हे सायकलवरून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता माझे लक्ष्य सायकलवरून १,000, १,२00, १,४00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचे आहे.
- अभिजित बंगाळे (सायकलपटू)