२0४९ शौचालये पूर्ण

By Admin | Published: October 21, 2014 01:43 PM2014-10-21T13:43:00+5:302014-10-21T13:43:00+5:30

मागील वर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता वाटत नाही.

204 9 complete toilets | २0४९ शौचालये पूर्ण

२0४९ शौचालये पूर्ण

googlenewsNext
>हिंगोली : मागील वर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता वाटत नाही. प्रामुख्याने दोन निवडणुका आणि संथगतीने होणार्‍या कामांमुळे अध्र्या वर्षात २१ हजार ६४ पैकी २ हजार ४९ शौचालयाची कामे झाली आहेत. 
संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत निर्मल भारत योजनेतून प्रतिवर्षी जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम केले जाते. दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थ्यांना त्यात अनुदानाची तरतूद करण्यात आली. प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामगारांना १0 हजारांचे अनुदान दिले जाते. 'बीपीएल'च्या लाभार्थ्यांना ४ हजार ६00 रूपये मिळतात. लाभार्थ्यांना अनुदान देऊनही नेहमी उद्दिष्ट अपुरे राहते. यंदाही तीच बोंब दिसते. वित्तीय वर्षाच्या सुरूवातीला जिल्हा विभागाकडून १६ हजार ५८८ शौचालयाचे उद्दिष्ट दिले होते. त्यात हिंगोली ३00४, वसमत २७५६, कळमनुरी २९१९, सेनगाव ४५३0 आणि औंढा तालुक्यासाठी ३३७९ शौचालयाचे उद्दिष्ट दिले होते; परंतु गतवर्षीही अपूर्ण कामांमुळे त्यात वाढ करून ते २१ हजार ६४ करण्यात आले. आज अर्धे वर्ष सरले असताना ५0 टक्केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. एका तालुक्याएवढीही कामे पूर्ण झालेली नाहीत. निवडणुकीचाही परिणाम या कामांवर झाला. सुरूवातीला लोकसभा निवडणुकीच्या कामात ग्रामसेवक गुंतले. जवळपास महिना या कामाविना गेला. दरम्यान, कामाला सुरूवात करून गती येताच विधानसभेचा सोहळा आला. पुन्हा हातातले काम बाजूला सारून निवडणुकीचे काम करावे लागले. जवळपास दोन महिन्यांत शौचालयांचे काम झालेले नाही. त्यामुळे सहा महिन्यांत ३0 टक्केही काम झाले नाही. एकाही तालुक्यातील आकडा चार अंकात नाही. सर्वाधिक सेनगाव ७५७ तर वसमत तालुक्यात ४0६ शौचालये उभारण्यात आली. हिंगोली तालुक्यात कासव गतीने होत असलेल्या कामाची प्रचिती येत आहे. औंढा तालुकाही हिंगोलीच्या पुढे जाऊन ४0६ पर्यंत पोहोचला. 
हिंगोलीत केवळ अडीचशे शौचालयाचे काम पूर्ण होऊ शकले. उर्वरित सहा महिन्यांत १९ हजार शौचालये उभी करावी लागणार आहेत. तरच हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. (प्रतिनिधी) 
 
■ शासन एकीकडे संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना कामे पूर्ण होत नसल्यामुळे सलग दुसर्‍यावर्षी जिल्ह्याची नाचक्की. 
■ गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना जिल्हा प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे यंदाही योजनेची शंभर टक्के कामे होण्याची शक्यता वाटत नाही.
■ वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे अधिकारी सुस्तावले आहेत. 
■ अत्यंत संथगतीने होणार्‍या कामांमुळे प्रती महिन्यास साडेतीन हजार शौचालयाचे काम करणे अवघड आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही कामे पूर्ण होईल, असे वाटत नाही.
 काश्मीर संबंध असल्याचे पुरावे सापडलेल 

Web Title: 204 9 complete toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.