वाळूची अवैध वाहतूक करणारे २१ ट्रक जप्त
By Admin | Published: June 1, 2014 12:17 AM2014-06-01T00:17:49+5:302014-06-01T00:29:04+5:30
अंबड/ वडीगोद्री: अंबड तालुक्यात बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. यामुळे दिवसरात्र नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे.
अंबड/ वडीगोद्री: अंबड तालुक्यात बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. यामुळे दिवसरात्र नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे. याविषयी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच महसूल व पोलिसांनी ३० मे रोजी दुपारी संयुक्त कारवाई करीत गोदावरीच्या नदीपात्रातून तब्बल २१ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे. गोदावरी नदीच्या कुराण शिवारात वाळूचा लिलाव झालेला नसतानाही शेकडो वाहने वाळू उपसा करीत आहेत. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सावंत, गोंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संयुक्त कारवाई केली. कुरण शिवारात २० ते २५ हजार ब्रास वाळूचा उपसा झाल्याचे दिसून आले. यामुळे नदीपात्रात पाच ते सात फुटांचे खड्डे पडल्याचे पथकाला दिसून आले. या कारवाईत एमएच २० सीटी ९२५०, एमएच वीस सीटी ३३३, एमएच वीस सीटी ७६०, एमएच वीस सीटी ८०५०, एमएच वीस सीटी ७६०७, एमएच २८ बी ८५७२, एमएच वीस एटी ७७, एमएच वीस सीटी ६५, एमएच १२ डीजी २६७३, एमएच ०४ डीके ९०५७ मिळून २५ वाहने व एक डोझर जप्त करण्यात आले. यावेळी गोंदीचे मंडळ अधिकारी एस.के.एडके, सी.क़मिरसे, जमादार विष्णू चव्हाण, मुळक, तलाठी पी.यू.काटकर, शहागडचे तलाठी एस.एस. डालके उपस्थित होते. याविषयी तहसीलदार सावंत म्हणाले, शुक्रवारी दुपारी गोदावरी नदीपात्रात कारवाई करण्यात आली. ११ वाहने जप्त केली. (वार्ताहर)