शिवशाही बसचे सहा महिन्यांत २२ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:16 AM2018-10-11T00:16:24+5:302018-10-11T00:16:56+5:30

जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते.

 22 accidents in the six months of Shivshahi bus | शिवशाही बसचे सहा महिन्यांत २२ अपघात

शिवशाही बसचे सहा महिन्यांत २२ अपघात

googlenewsNext
ठळक मुद्दे ५ प्राणांतिक अपघात : ‘एसटी’ची आज मराठवाडास्तरीय बैठक



औरंगाबाद : जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते.
एसटी महामंडळाची गुरुवारी मराठवाडास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक होत आहे. या बैठकीत ‘एसटी’च्या विविध विषयांबरोबर शिवशाही बसच्या अपघातांच्या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते. एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बससेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या.
वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात शिवशाही बसची संख्या आता ४९ वर गेली आहे. यामध्ये २८ एसटी महामंडळाच्या, तर २१ बस भाडेतत्त्वावरील आहेत. बसच्या अपघातांसाठी अप्रशिक्षित चालक, बस चालविण्याची पद्धत, बसमधील तांत्रिक दोष, हवामान, इतर वाहनचालकांची चूक, अशी कारणांची शक्यता वर्तविली जाते; परंतु शिवशाही बसच्या अपघातांसाठी कोणत्याही एका कारणावर शिक्कामोर्तब केले जात नाही. शिवशाही बसचे अपघात रोखण्यासाठी सध्या एसटी महामंडळाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये बसवरील कार्यरत खासगी व एसटीचालकांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
वेगवेगळी कारणे
एसटी महामंडळाचे औरंगाबाद विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले, शिवशाही बसच्या अपघाताची कारणे ही वेगवेगळी आहेत. प्रत्येक अपघाताच्या वेळी वेगळे कारण आहे. हवामानामुळेदेखील अपघात होतात.

Web Title:  22 accidents in the six months of Shivshahi bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.