भाविकांच्या सुविधेसाठी २२ बस
By Admin | Published: September 26, 2014 12:21 AM2014-09-26T00:21:14+5:302014-09-26T01:55:35+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे विविध ठिकाणी २२ बस सोडण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे विविध ठिकाणी २२ बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय कर्णपुऱ्यासाठीही जादा शहर बस सोडण्यात येणार आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी मोहटादेवी, वणी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. गर्दी लक्षात घेऊन विभागातर्फे प्रत्येक आगारातून बस सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये मध्यवर्ती बसस्थानकातून ४, सिडको बसस्थानकातून ३, पैठणमधून ४ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आगारातून बसचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय गंगापूर, वैजापूर आगारातून लासूर येथील देवी दाक्षायणी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच नवरात्रोत्सवात कर्णपुरा येथे दररोज लाखो भाविक देवीचे दर्शन घेतात. पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी वाढत असते. महामंडळाकडून कर्णपुऱ्यासाठीही जादा शहर बस सोडण्यात येणार आहेत.