अद्रक नुकसानीपोटी ५१६ शेतकऱ्यांच्या खात्यात २२ लाख ४९ हजार ८०० रुपये
By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:38+5:302020-12-02T04:09:38+5:30
हतनूर येथे चिकलठाण मंडळाअंतर्गत १ हजार ३४४ हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात अद्रक लागवड क्षेत्र आहे. मात्र, गत चार ते ...
हतनूर येथे चिकलठाण मंडळाअंतर्गत १ हजार ३४४ हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात अद्रक लागवड क्षेत्र आहे. मात्र, गत चार ते पाच महिने सतत अतिवृष्टी झाल्याने अद्रकावर सड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यातच पडलेल्या पावसामुळे अद्रकीवर रोगाची लागण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अद्रक पिकाच्या नुकसानाविषयी ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. त्याची दखल शासनाने घेत ५१६ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २२ लक्ष ४९ हजार आठशे रुपये जमा केले.