मराठवाड्यात २२ लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; नुकसानीचे पंचनामे ३९ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:30 PM2024-09-10T13:30:40+5:302024-09-10T13:35:01+5:30
मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. ७ लाख २० हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून, ११ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहेत.
मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. यात १७ लाख ५६ हजार ८८९ हेक्टरवरील जिरायत, २७ हजार ८६३ क्षेत्रावरील बागा, तर २१ हजार ११० हेक्टरवरील फळबागांना पावसाचा तडाखा बसला. नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ९९३ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८१ हजार ६७९ हेक्टर, लातूरमधील २ लाख ६ हजार ६१४, तर जालना २ लाख १२ हजार ५६९, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७६ हजार ९३६, बीडमध्ये १ लाख १८ हजार ४२५, तर धाराशिव जिल्ह्यात ६ हजार ६७ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हा-बाधित शेतकरी-एकूण बाधित क्षेत्र-पंचनाम्याचे क्षेत्र- पंचनाम्याची टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर - ३१६०५९ - १७६९३६.०७ - २९२६५ - २०.५३
जालना - २४५७८४ - २१२५६९.३२ - ५९८४७.१६ - १५.४३
परभणी - ४५९०१२ - ३५१५७८ - २२९००७.३६ - ८५.०५
हिंगोली - २८१६८८ - २८१६७९ - १९८५१७.५ - ६७.३८
नांदेड - ५८८२५३ - ४५१९९३ - ५८३४३ - १३.२६
बीड - १०८५३७ - ११८४२५.८० - २७६१५.८३ - २३.७८
लातूर - २४२५७२ - २०६६१४.१० - ६३६५६.१ - ३३.८२
धाराशिव - ६५४० - ६०६७ - ६०६.७ - १.२५
एकूण - २२४८४४५ - १८०५८६२.२९ - ६६६८५८.६५ - ३९.६५