२२ गावांतील कृषी पंपाची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:16 AM2017-11-03T00:16:03+5:302017-11-03T00:16:07+5:30
जिंतूर तालुक्यातील येलदरी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाºया २२ गावांमधील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी: जिंतूर तालुक्यातील येलदरी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाºया २२ गावांमधील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे.
येलदरी परिसरातील शेतकºयांनी धरणाच्या पाण्यावर पिकांचे नियोजन केले होते. सध्या रब्बी हंगामाची धामधूम सुरु असून ऐन रब्बी पेरणीच्या काळातच महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु केली आहे. थकबाकीच्या नावाखाली २० ते २२ गावांमधील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षी पावसाअभावी खरीप हंगामातून उत्पन्न मिळाले नाही. आता रब्बी हंगामातही विजेअभावी शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रश्नी कृषीपंपाची वीज जोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.