२२ रेशन दुकानदारांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:25 AM2017-11-16T00:25:22+5:302017-11-16T00:25:31+5:30
ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़
परभणी जिल्ह्यात मे महिन्यापासून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्याने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनचे तालुकानिहाय प्रशिक्षण रेशनदुकानदारांना दिले़ त्याचप्रमाणे २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात ई-पॉस मशीन हाताळण्यासंदर्भात तांत्रिक अधिकाºयांमार्फत मार्गदर्शनही करण्यात आले़ ३० मे रोजीच्या पत्रानुसार तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लिंकवेल कंपनीच्या तांत्रिक अधिकाºयांनी सर्व ई-पॉस दुकानांतील मशीनचे प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणही दिले़ त्यानंतर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करण्याचे बंधनकारक केले होते़ सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वितरित करताना त्यात पारदर्शकता यावी, सर्व धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे, या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र त्यानंतरही काही रेशन दुकानदार ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करीत नसल्याची बाब पुरवठा अधिकाºयांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न झाल्यास कारवाई करण्याचा पवित्रा पुरवठा विभागाने घेतला आहे़ त्याअंतर्गत पुरवठा विभागातील नायब तहसीलदारांकडून मिळालेल्या अहवालानुसार १० रेशन दुकानदारांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ५० पेक्षा कमी ट्रान्झेक्शन केल्याचे निदर्शनास आले़ याचाच अर्थ किमान ५० लाभार्थ्यांनाही महिनाभरात ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित केले नाही़ तसेच १२ रेशन दुकानदारांनी केलेले आधार व्हेरीफिकेशन हे शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे २२ रेशन दुकानदारांनी अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयातील तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी २२ रेशन दुकानदारांची परवान्यापोटी जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला असून, या पुढे अशा चुकांची पुनरावृत्ती करू नये, अशी ताकीद या दुकानदारांना दिली आहे़