२२ हजार ७३ मतदारांनी वापरला ‘नोटा’

By Admin | Published: February 25, 2017 12:40 AM2017-02-25T00:40:21+5:302017-02-25T00:41:51+5:30

जालना जिल्ह्यातून २२ हजार ७३ मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाचे (वरीलपैकी एकही नाही) बटण दाबून आपली नापसंती दर्शविली.

22 thousand 73 voters used 'Nota' | २२ हजार ७३ मतदारांनी वापरला ‘नोटा’

२२ हजार ७३ मतदारांनी वापरला ‘नोटा’

googlenewsNext

गजानन वानखडे जालना
जिल्हात जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समितीच्या ११२ गणासाठी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातून २२ हजार ७३ मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाचे (वरीलपैकी एकही नाही) बटण दाबून आपली नापसंती दर्शविली.
ग्रामीण भागासाठी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या जि.प. आणि पंचायत समितीची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही महत्त्चाची मानली जाते. ग्रामीण भागात करण्यात येणारी विकासाची संपूर्ण कामे जि.प. पं.स. समितीच्या माध्यमातूनच करण्यात येते. त्यातच शासनाने ग्रा.पं. थेट निधी देण्यात येत असल्याने पं.स. माध्यमातून ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी अनेकांना ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु आठही तालुक्यांतून २२ हजार ७३ मतदारबंधूंनी दिलेल्या उमेदवारांना नाकारल्याने काही उमेदवार काठावर निवडून आले तर, काहींना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.
जि.प. पं.स. निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इ. पक्षांंनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. केंद्र शासनाने अचानक केलेल्या नोटाबंदीचा फटका सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला बसेल, असा तर्क काढण्यात येत होता. त्यातच सेना भाजपा युती तुटल्याने याची शक्यता जास्त वाढली होती. परंतु भाजपाने मुसंडी मारत जि.प. २२ आणि पं. स. ५४ जागा पटकावून सर्वच पक्षांना धक्का दिला.
यात जालना तालुक्यातून ९ आणि १८ गणांसाठी झालेल्या जि.प. आणि पं.स.मतमोजणीत तालुक्यात ३ हजार ५१५ मतदारांनी नोटाला पसंती दिली. यात ९ गटात १५१० आणि १८ गटात २०१५, भोकरदन तालुक्यातील जि.प. ११ गटात १९२६ आणि पं.स. गणात २४६६, बदनापूर तालुक्यातील जि.प. ५ गटात ७३६, १० गणात ७९४, मंठा तालुक्यात ५ गटात ११२८, १० गणात १२८३, परतूर तालुक्यात ५ गटात ९३३, १० गटात ११२४, जाफराबाद तालुक्यात ५ गटात ६७० , १० गणात ९००, अंबड तालुक्यात ८ गटात ११७५, १६ गणात १८०५, घनसावंगी तालुक्यात ८ गटात १२४९, १६ गणात १३०२ मतदारांनी नोटाला पसंती देत उमेदवारांना नाकारले. यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक कमी बदनापूर तालुक्यातील मतदारांनी नोटाचा वापर केला. तर सर्वाधिक भोकरदन तालुक्यात नोटाचे बटण दाबून उमेदवारांना नाकारले.

Web Title: 22 thousand 73 voters used 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.