जिल्ह्यातील २२ पर्यटनस्थळांचा योजनांतून होणार कायापालट!

By Admin | Published: May 20, 2017 12:48 AM2017-05-20T00:48:45+5:302017-05-20T00:50:00+5:30

जालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे.

22 tourism projects in the district will be transformed! | जिल्ह्यातील २२ पर्यटनस्थळांचा योजनांतून होणार कायापालट!

जिल्ह्यातील २२ पर्यटनस्थळांचा योजनांतून होणार कायापालट!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री यांनी नुकतीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे. राज्या शासनाच्या विविध विभागांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे.
राज्यात जेथे पर्यटन केंद्र आहे त्या भागाचा गतीने विकास झालेला आपल्याला दिसून येतो. रोजगाराच्या संधीसह आर्थिक उलाढाल वाढीचे हे प्रमुख कारण आहे. पर्यटनावर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्य, देशपातळीवर आणि परदेशी पाहुणेही भर देतात. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण व्हावे, यादृष्टिने जिल्ह्यात पर्यटन क्लस्टर तयार करण्याचा निर्णय स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे. जाळीचा देव, राजूर, शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ, सूर्य मंदिर, वेद मंदिर, मत्स्योदरी मंदिर, रेणुका देवी आदी तीर्थस्थळ आणि पर्यटन केंद्रांचा यामध्ये अंतर्भाव आहे. स्थळांची यादी तयार करण्यात आली असून, स्थळानुसार प्राधान्यक्रम ठरवून त्या भागाच्या विकासासाठी पर्यटन, ग्रामीण विकास, जिल्हा नियोजन यासह विविध विभागांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांसमवेत आपण बैठक करणार आहोत. त्या-त्या गावाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करुन कालबद्ध कार्यक्रम राबविणार असल्याचे लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ग्रामविकास, पर्यटन मंत्रालय, जिल्हा नियोजन समितीचा निधी, आमदार, खासदार आणि विशेष उपक्रमांतर्गत निधी या गावांच्या विकासकामांसाठी वापरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 22 tourism projects in the district will be transformed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.