११ वर्षीय मुलासह जिल्ह्यातील २३ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:31+5:302021-05-24T04:04:31+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या रविवारी चारशे खाली आली. दिवसभरात ३७७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६८७ रुग्ण ...
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या रविवारी चारशे खाली आली. दिवसभरात ३७७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६८७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याची स्थिती आहे. शिरोडी, फुलंब्री येथील ११ वर्षीय मुलासह औरंगाबाद जिल्ह्यातील २३ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच अन्य जिल्ह्यांतील ९ रुग्णांचाही मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ५ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ४११ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३१ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,०७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ३७७ नव्या रुग्णांत शहरातील १२४, तर ग्रामीण भागातील २५३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २५० आणि ग्रामीण भागातील ४३७ अशा ६८७ रुग्णांना सुटी देण्यात आली. रुग्णसंख्या कमी होताना जिल्ह्यात वाढत्या मृत्यूदराने चिंता व्यक्त होत आहे.
उपचार सुरु असताना भगतसिंगनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, विश्रांतीनगर, मुकुंदवाडी येथील ७० वर्षीय महिला, बिडकीन येथील ६० वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती चौक, जवाहर काॅलनी येथील ७० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, अजिंठा येथील ५० वर्षीय महिला, बजाजनगर येथील ८८ वर्षीय पुरुष, छत्रपतीनगर, सातारा परिसर येथील ५१ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७१ वर्षीय महिला, कोळवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५० वर्षीय पुरुष, रामनगर, मुकुंदवाडी येथील ७३ वर्षीय महिला, भीमनगर येथील ६० वर्षीय पुरुष, नारेगाव, चिकलठाणा येथील ५८ वर्षीय महिला, केकटजळगाव, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ७७ वर्षीय पुरुष, तालवाडा, सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, पिशोर, कन्नड येथील ७४ वर्षीय महिला, नागठाण, वैजापूर येथील ४७ वर्षीय महिला, लोहगाव, पैठण येथील ५१ वर्षीय महिला, शिरोडी, फुलंब्री येथील ११ वर्षीय मुलगा, सराफाबाजार येथील ६७ वर्षीय महिला, शहरातील ७० वर्षीय पुरुष आणि बीड जिल्ह्यातील ४० वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ३० वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर ४, संजीवनी सोसायटी १, साफल्य सोसायटी १, बन्सीलालनगर १, भावसिंगपुरा २, जाधववाडी ३, अयोध्यानगर १, डी. के. एम. एम. हॉस्पिटल १, बीड बायपास ५, सातारा परिसर ६, सम्राटनगर १, पुंडलिकनगर ४, श्रेय नगर १, गारखेडा २, शिवाजीनगर १, अजिंक्यनगर १, तापडियानगर १, संतोषी मातानगर २, गणेशनगर २, विश्रांतीनगर २, मुकुंदवाडी ३, राजे सिध्दन हाऊसिंग सोसायटी १, वसंतनगर १, केशरनगरी १,नारेगाव १, निजमिया कॉलनी १, कटकट गेट २, गुलमंडी ३, पगारिया अपार्टमेंट, भडकल गेट १, अहबब कॉलनी १, ज्योतीनगर १, शहाबाजार १, जुना जकात नाका, हर्सुल १, हर्सुल टी पाॅईंट २, कुशलनगर १, एन-८ येथे ४, एन-४ येथे ३, एन-९ येथे २, एन-११ येथे १, एन-१ येथे १, एन-७ येथे २, एन-१२ येथे १, अन्य ४७
ग्रामीण भागातील रुग्ण
वडगाव कोल्हाटी ५, खिंवसरा इस्टेट, सिडको महानगर ३, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज ६, लोहगाव १, बजाजनगर २, वाळूज एमआयडीसी. १, तिसगाव २, मांजरी, ता.गंगापूर १, ता. कन्नड १, करोडी १, शेंद्रा एमआयडीसी. २, पिसादेवी १, चिंचोली, ता.पैठण १, दिशा संस्कृती, कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, उमरखेडा ता. कन्नड १, चिकलठाणा १, पिशोर १, मेल्ट्रान ता. पैठण १, सोनेवाडी, ता.पैठण १, दाडेगाव ता. पैठण २, जळगाव ता. पैठण ७, लिमगाव, ता. पैठण १, सुलतानपूर ता. पैठण १, म्हस्की, ता. वैजापूर १, विरगाव, ता. वैजापूर २, गंगापूर रोड, ता. वैजापूर २, भगूर, ता. वैजापूर १, घायगाव, ता.वैजापूर १, पाटील गल्ली, ता. वैजापूर १, फुलेवाडी रोड, ता. वैजापूर ३, कोल्ही, ता.वैजापूर १, नवजीवन कॉलनी, ता. वैजापूर १, टेंभी ता. वैजापूर १, मुस्ताफा पार्क, ता. वैजापूर १, कोल्ही ता.वैजापूर १, भिलवाणी, ता. वैजापूर २, शेळकेवस्ती ता. वैजापूर २, शिरसगाव, ता. वैजापूर १, लखनगंगा, ता.वैजापूर १, विहमांडवा, ता.पैठण १, लासुरा, ता.पैठण १, अन्य १८३