२४ स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा करणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:32 AM2017-08-14T00:32:56+5:302017-08-14T00:32:56+5:30

आधार पडताळणी कमी असणाºया २४ स्वस्त धान्य दुकानदारांचा धान्य पुरवठा कमी केला जाणार आहे.

 24 Foodstuff shops will not be able to supply food grains | २४ स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा करणार कमी

२४ स्वस्त धान्य दुकानांचा धान्य पुरवठा करणार कमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर: जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. बदनापूर तालुक्यात पॉस मशीनद्वारे होणाºया धान्य वाटपात आधार पडताळणीचे प्रमाण केवळ ३८ टक्के आहे. आधार पडताळणी कमी असणाºया २४ स्वस्त धान्य दुकानदारांचा धान्य पुरवठा कमी केला जाणार आहे.
बदनापूर तालुक्यात ११४ स्वस्तधान्य दुकानदारांना पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे आधारकार्डच्या क्रमांकाच्या आधारे धान्य वाटप करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ११३३९५ लाभार्थ्यांपैकी ९६४७६ जणांकडे आधार कार्ड असून, याची टक्केवारी ८५़०८ टक्के आहे.
पैकी केवळ ३८़४६ टक्के आधारकार्डची पडताळणी झालेले आहे. आधार पडताळणीध्ये बदनापूर तालुक्याचा जिल्ह्यात सातवा क्रमांक आहे. काही स्वस्तधान्य दुकानदार रेंज नसल्याचे कारण सांगून पॉस मशीन वापरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी श्रीरंग जºहाड म्हणाले, तालुक्यात आधार पडताळणी वाढविण्यासाठी दुकानदार प्रयत्न करत आहेत. परंतु पॉस मशीनला रेंज उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. प्रत्येक गावातील नागरिकांचे आधारकार्ड तहसीलमधील मशीनमध्ये नोंद केलेले नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना बारकोड क्रमांक मिळालेला नाही, असे संघटनेचे सहसचिव दामोधरराव काळे यांनी सांगितले.

Web Title:  24 Foodstuff shops will not be able to supply food grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.