२४ तास पाणी !

By Admin | Published: April 15, 2017 11:29 PM2017-04-15T23:29:36+5:302017-04-15T23:34:29+5:30

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले

24 hours water! | २४ तास पाणी !

२४ तास पाणी !

googlenewsNext

लातूर : लातूर महापालिकेत जर भाजपाची सत्ता आली तर शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी लातूरकरांना दिले आहे. येथील राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, रमेश कराड, जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, अख्तर मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, नेतृत्वात दम असला की विकास होतो. लातूरचे जगात नाव झाले ते रेल्वेने पाणी देण्यासाठी. ही काय नाव करायची गोष्ट आहे काय? आम्ही रेल्वेने पाणी पुरविले. जर मनपात आमची सत्ता आली तर या शहराला नागपूरच्या धर्तीवर २४ तास पाणीपुरवठा करणार आहोत. कचऱ्यापासून खतनिर्मिती करु. भारताच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयींच्या काळात १ लाख ७० गावांना जोडणारे रस्ते आम्ही दिले. चारपदरी महामार्ग दिले. आता मराठवाड्यात ९८ हजार कोटींचे तर लातुरात नऊ हजार कोटीचे महामार्ग बांधण्यात येतील. या महामार्गावरचे सर्व पूल हे ‘पूल कम् बंधारे’ असतील, असेही ते म्हणाले. मी आल्या-आल्या पालकमंत्र्यांना विचारले की, लातूरच्या एमआयडीसीला दररोज किती पाणी लागते हे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारा. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले तर तो विचारुन सांगतो, असे म्हणाला. ज्या अधिकाऱ्याला दररोज एमआयडीसीला पाणी किती लागते हे माहिती नाही, अशांना ठेवताच कशाला, असा सवाल गडकरी यांनी केला. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला. तो म्हणजे नागपूरकरांनी टॉयलेटमध्ये वापरले पाणी रिसायकल करुन विकले. लातूरमध्ये असेच करण्यात येईल. वापरलेले पाणी रिसायकल करुन एमआयडीसीला देण्यात येईल, अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या आहेत़

Web Title: 24 hours water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.