जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के जलसाठा
By Admin | Published: May 16, 2017 12:41 AM2017-05-16T00:41:18+5:302017-05-16T00:44:14+5:30
जालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे. दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा समाधानकारक असल्याचे चित्र लघू पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट होते.
जिल्ह्यात साम मध्यम प्रकल्प आहेत. कल्याण गिरजा मध्यम प्रकलपात ३२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात २२. ७३ टक्के, जुई मध्यम प्रकल्पात ६.१४, धामणा मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. जीवरेखा धरणात ८.१६ टक्के पाणी आहे. गल्हाटी मध्यम प्रकल्पात ३१ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. तीन प्रकल्पात २५ ते ५० टक्के साठा आहे. तर ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के जलसाठा आहे. ५७ प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प कोरडे ठाक आहेत. १८ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. एकूणच यंदा वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांतील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी बहुतांश प्रकल्पांत पाणी असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा असल्यामुळे टँकर संख्याही कमी झाली आहे. ६४ प्रकल्पांत पाणी असल्याने ग्रामीण भागात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नाही. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यक प्रकल्पात सर्वात कमी म्हणजे ६.१४ टक्के एवढाच साठा आहे.