२४ रेल्वेस्टेशनसाठी २४० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:18 AM2017-07-30T01:18:09+5:302017-07-30T01:18:10+5:30
औरंगाबाद : देशातील २४ रेल्वेस्टेशनसाठी रेल्वे आणि पर्यटन मंत्रालयाने २४० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील २४ रेल्वेस्टेशनसाठी रेल्वे आणि पर्यटन मंत्रालयाने २४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या २४ मध्ये नांदेड आणि औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. या निधीतून प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासह जागतिक दर्जाचे रेल्वेस्टेशन बनविण्यावर भर राहणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा यांनी सांगितले.
डॉ. ए. के. सिन्हा यांनी शनिवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या मालधक्क्यावरील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. २४० कोटी आणि २४ रेल्वेस्टेशन याप्रमाणे प्रत्येक रेल्वेस्टेशनला किमान १० कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सिन्हा यांनी मालधक्क्यावरील वापर नसलेला रेल्वे रूळ काढून टाकण्याची सूचना केली. मालवाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असून, त्यादृष्टीने सुविधा देण्याचे नियोजन केले जात आहे. तपोवन एक्स्प्रेसमधील पेंट्रीकारच्या (खानपान बोगी) पाहणीत आढळून आलेल्या त्रुटींसंदर्भात दोन हजार रुपयांचा दंड लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वे अधिकाºयांचा हा दौरा देवदर्शनासाठीच होता, अशी चर्चा पुन्हा एकदा डॉ. सिन्हा यांच्या दौºयानिमित्त रेल्वेस्टेशनवर सुरू होती.