२४ उपायांना टंचाईत मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:06 AM2018-04-14T00:06:44+5:302018-04-14T00:07:00+5:30
जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
दरवर्षीच काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. काही ठराविक गावांमध्ये तर टँकरशिवाय पर्याय राहात नाही. अशा गावांना कायमस्वरुपी उपाय केला नाही. यंदा जि.प.कडून जवळपास ५२ गावांचे टंचाईत पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात शंका आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तहसीलदारांनी यात तपासणी करून वस्तूनिष्ठ अहवाल द्यावा, असे बजावले होते. मात्र हिंगोली वगळता इतर कोणत्याही तालुक्याने वेळेत अहवाल दिला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव तसेच पडून होते. आता अहवाल येताच जिल्हाधिकाºयांनी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यात हिंगोली तालुक्यातील वडदला १.६0 लाख, पांगरीला-२.७३ लाख, इडोळीला ४.0५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
सेनगाव तालुक्यात गणेशपूरला-४.0२ लाख, पानकनेरगाव- २.८९ लाख, कहाकर बु.-२.२४, धनगरवाडी-२.१३, धानोरा बंजारा-२.0७, खडकी- २.९८, धोतरा-३.८५, भगवती-१.९0 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तीनच तालुक्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून वसमत, औंढ्याचे बाकी आहेत. यापैकी औंढा येथील प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने दुरुस्ती करून पाठविण्यास सांगितले आहे.
कळमनुरी तालुक्यात टंचाईत सर्वाधिक १३ नळयोजना दुरुस्त्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये झुनझुनवाडी-३.४१ लाख, कुंभारवाडी-२.४६ लाख, दाती-२.६२ लाख, नवखा-२.५४ लाख, खरवड-१४.५७ लाख, डिग्गी-२.७१ लाख, तरोडा-२.६१ लाख, सिंदगी-६.१0 लाख, कुर्तडी-२.२२ लाख,
पेठवडगाव-२.८७ लाख, बोल्डा-२.९४ लाख, कवडा-२ लाख अशी एकूण ६५ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरही या तालुक्यात मात्र गावांची संख्या भरपूर असून काही ठिकाणचे यापूर्वी टँकरचे प्रस्ताव यायचे.
कळमनुरी तालुक्यातील शिवनी खु. येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईन तुटली होती. तेव्हापासून हे गाव टंचाईत होते. १८ लाख मंजूर झाल्याने ही अडचण दूर होणार आहे.