देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2023 08:45 PM2023-07-29T20:45:09+5:302023-07-29T20:45:19+5:30

गावांमध्ये ‘बीएसएनएल’ देणार ‘४-जी’ सेवा : मनुष्यबळासाठी ‘आऊटसोर्सिंग’चा पर्याय

24 thousand in the country; 2,580 villages in the state 'out of coverage' | देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

देशात २४ हजार, तर राज्यात २,५८० गावे ‘ऑऊट ऑफ कव्हरेज’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जगभरात ‘५-जी’ चर्चा होत असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील २४ हजार आणि महाराष्ट्रातील तब्बल २,५८० गावांपर्यंत अद्यापही मोबाइलची रेंज पोहोचलेली नाही. या गावांमध्ये ‘बीएसएनएल’ ‘४-जी’ सेवा देणार आहे. त्यादृष्टीने डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती ‘बीएसएनएल’चे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी औरंगाबाद विभागाचे महाव्यवस्थापक संजयकुमार यांची उपस्थिती होती. रोहित शर्मा म्हणाले, जेही तंत्रज्ञान वापरले जाईल, ते भारतातच विकसित झालेले असावे, असे पंतप्रधानांचे व्हिजन आहे. त्यादृष्टीने ४-जी टेक्नाॅलाॅजी विकसित केले. मार्चमध्ये भारत पाचवा देश झाला, ज्याच्याकडे स्वत:ची ४-जी टेक्नाॅलाॅजी आहे. टीसीएसने तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यांची सिस्टम चंडीगड येथे लावण्यात आली. त्यानंतर पंजाबसाठी २०० बेस ट्रान्सिवर स्टेशन (बीटीएस) ऑर्डर दिली आणि त्यांचा मार्चमध्ये पुरवठाही झाला. आता देशभरासाठी एक लाख ‘बीटीएस’ची ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी १० हजार असतील. सप्टेंबरपासून ते मिळण्यास सुरुवात होतील. महाराष्ट्रातील टाॅवरसाठी २ हजार बॅटरी उपलब्ध होणार आहेत. ‘बीएसएनएल’मध्ये सध्या मनुष्यबळासाठी ‘आउटसोर्सिंग’चाच पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

जेथे कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ शासनाने २०२२ मध्ये ‘अन् कव्हर्ड व्हिलेज’ हा प्राेजेक्ट हाती घेण्यात आला. ज्या गावांत कोणाचेही सिग्नल नाही, तेथे ‘बीएसएनएल’ ४-जी सेवा देईल. देशात अशी २४ हजार गावे आहेत. महाराष्ट्रातील २८०० गावांत ४-जी सेवा दिली जाईल. यातील २२५ गावांत २-जी, ३-जी सेवा आहे, तर नवीन २,५८० गावे असून, तेथे कोणाचेही सिग्नल नाही. तेथे जमीन घेऊन ‘बीटीएस’ लावण्यात येईल, असे रोहित शर्मा म्हणाले.

४-जी हे ५-जी सारखेच, पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’
४-जी हे ५-जी सारखेच आहे. पुण्यात ‘मोबाइल कोअर नेटवर्क’ येत आहे. यातून पूर्ण झोन नियंत्रित करता येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील या गावांत येणार ‘रेंज’ औरंगाबाद जिल्ह्यातील बेलखेडा तांडा, दस्तापूर, दुधमल, मालेगाव लोखंडी, पोफळा, जळगाव घाट, बोडखा, आडगाव माळी, तेरवाडी, लिंगदरी, कानकोरा, पुरणवाडी, गोकुळवाडी या गावांमध्ये लवकरच ४-जी रेंज येणार आहे.

Web Title: 24 thousand in the country; 2,580 villages in the state 'out of coverage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.