२४५१ विद्यार्थ्यांची माहिती अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:40 AM2017-08-29T00:40:48+5:302017-08-29T00:40:48+5:30
अल्पसंख्यांक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच एका दिवसांत २४५१ विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वृत्ताची दखल घेत माहिती तत्काळ आॅनलाईन सादर केल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अल्पसंख्यांक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच एका दिवसांत २४५१ विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वृत्ताची दखल घेत माहिती तत्काळ आॅनलाईन सादर केल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना बँक खात्यावर एक हजार रूपये रक्कम जमा केली जाते. ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख आहे. परंतु संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनवर सादर केली नव्हती. एकूण ८३०७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच उपलब्ध असल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहू शकतात. त्यामुळे आता उर्वरित विद्यार्थ्यांचीही माहिती लवकरच उपलब्ध होईल,असे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्हा लॉगीनला प्राप्त झालेली विद्यार्थ्यांची माहिती नॅशनल पोर्टलवर पाठविली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना निश्चित शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. शिवाय इतर पात्र विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होणे तितकेच महत्त्वाचे आहे.