७ शेतकºयांना अडीच कोटींचा मोबदला; विरोध मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:58 AM2017-09-20T00:58:38+5:302017-09-20T00:58:38+5:30

राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे.

25 crores compensation to 7 farmers; The conflict prevailed | ७ शेतकºयांना अडीच कोटींचा मोबदला; विरोध मावळला

७ शेतकºयांना अडीच कोटींचा मोबदला; विरोध मावळला

googlenewsNext

जालना : राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई येथील सात शेतकºयांनी मंगळवारी आपल्या जमिनीची विक्री प्रक्रिया पूर्ण केली. या शेतकºयांच्या बँक खात्यात अडीच कोटींचा मोबदला जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यरस्ते विकास महामंडळाचे विभागीय प्रशासक जगदीश मनियाय यांच्या उपस्थितीत आज बदनापूर तहसील कार्यालयात गेवराईबाजा येथील सात शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण करण्यात आले. चार हेक्टर १२ आर जमिनीसाठी या शेतकºयांना दोन कोटी ३७ लाखांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदल्याची रक्कम आरटीजीएसद्वारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. तसेच जालना तालुक्यातील अंहकार देऊळगाव, तांदूळवाडी, बदनापूर तालुक्यातील गोकूळवाडी येथील काही शेतकºयांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या शेतकºयांच्या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी हक्क बचाव समितीच्यावतीने समृद्धी महामार्गास जमीन देण्यास विरोध करण्यात येत आहे.
नाशिक भागातील जमिनीला दिलेल्या मोबदल्या प्रमाणेच सर्व भागातील शेतकºयांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

Web Title: 25 crores compensation to 7 farmers; The conflict prevailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.